मामा पेंडसे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला.
मामा पेंडसे हे गाजलेले नट होते. ‘पंडितराज जगन्नाथ’,‘वहिनी’,‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मामा पेंडसे यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. मामांचा दुधाचा व्यवसाय होता.
वास्तविक नट होण्याच्या इच्छेने त्यांनी नाटक मंडळीत प्रवेश केला नव्हता. घरची गरिबी, वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने ते पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासून पेंटिंगची फार आवड.
मामा पेंडसे यांचे १२ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.
Leave a Reply