विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, भाषा, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर संशोधन करणार्‍या संशोधकांची माहिती.

ढवळीकर, (प्रा.) (डॉ.) मधुकर केशव

पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
[…]

जाधव, विजय

पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.
[…]

पवार, (डॉ.) वसंत

एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.

निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला.
[…]

म्हसकर, (डॉ.) सुभाष रामकृष्ण

ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल. […]

केळकर, चंद्रकांत

चंद्रकांत केळकरांचा पेशा शिक्षकाचा असला तरी, त्यांचा पिंड सक्रिय कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. गेली तीस-चाळीस वर्षे त्यांनी केलेलं परिवर्तनाच्या चळवळीतील लिखाण, संघटन कौशल्य, चळवळीतील कृतिशीलता अशा चौफेर वाटचालीची दखल घ्यायालाच हवी . […]

गजानन शंकर वामनाचार्य

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक असलेले श्री वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरी नंतरही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. मराठी आडनावांचा मोठा संग्रह.
[…]

कर्वे, आनंद दिनकर

ग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ […]

उदगावकर, भालचंद्र माधव

विज्ञानशिक्षण प्रणालीत मूलभूत बदल घडवून आणणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर)मध्ये मूलकण भौतिकीत संशोधन केले.
[…]

देशपांडे, गौरी

गौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.
[…]

1 5 6 7 8 9 10