ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहचलेल्या नेत्यांची माहिती

पाटील, वसंतदादा

आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्‍या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.
[…]

मारोतराव कन्नमवार

मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
[…]

नाईक, वसंतराव

वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.
[…]

पवार, शरद

माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव. […]

अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)

तडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली.
[…]

भोसले, (बॅरिस्टर) बाबासाहेब

विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
[…]

गडकरी, रमेश शंकर

ठाणे शहरामधील अनेकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचा सहभाग होता. स्वातंत्र्यसैनिकांची संख्याही लक्षणीय होती. अशांपैकीच एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ठाण्याच्या उथळसर विभागातील एक नागरिक कै. रमेश शंकर गडकरी होते. […]

देशपांडे, चिंतामणी गणेश

जन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली. […]

कर्णिक, व्हि. बी.

व्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते. […]

1 10 11 12 13 14