समिक्षक

बेडेकर, दिनकर केशव

दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्‍या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत […]

पाटील, कावेरीताई

१९४२ सालच्या ऊठावावेळी जेव्हा सबंध भारत स्वातंत्राच्या चैतन्यमयी लाटांवर स्वार होण्याकरिता संघटीत झाला होता, त्यावेळी स्त्रियांचं योगदान बहुमूल्य होतं; अश्या आवर्जुन घेतल्या जाणार्‍या नावांपैकी एक नाव म्हणजे कावेरीताई पाटील. मोर्चे व सत्याग्रहांमधील सहभागामुळे कावेरीताईंना दोन […]

आयरे, लाडकोजीराव कृष्णाजी

उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन […]

केतकर, कुमार

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अणि खर्‍या अर्थाने जगरहाटी करुन निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे पक्के ठाणेकर. आठ वर्षं “महाराष्ट्र टाईम्स”, त्यानंतरची सात वर्षे “लोकसत्ता”, नंतर `लोकमत’ आणि शेवटी `दिव्य मराठी’ या मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद त्यांनी भूषविले आहे. […]

नांदगावकर, सुधीर वासुदेव

सुधीर नांदगावकर, हे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष होते. त्यानिमित्त जगातील अनेक महोत्सवात ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आतापर्यंत बर्‍याच पुस्तकांचे लेखनही केले आहे.
[…]

बोरकर, श्रीराम कृष्णाजी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव […]

देसाई, हेमंत

हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले.
[…]

भंडारी, अमित

अमित भंडारी हा स्टार माझा या मराठीमधील सध्या सर्वात आघाडीवरच्या वृत्तवाहिनीवर दररोज झळकणारा एक लोकप्रिय पत्रकार आहे. दिलखुलास गप्पा मारून समोरची व्यक्ती कितीही छोटी किंवा मोठी का असेना, तिला बोलतं करण्याची कला अमितला उत्तमरित्या जमते. आजवर अनेक मराठी व हिंदी भाषेशी जोडले गेलेले कलाकार, व्यावसायिक, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंफल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती त्याने सारख्याच सहजतेने व त्याच्या मिश्कील शैलीमध्ये घेतल्या आहेत.
[…]

माडखोलकर, गजानन त्र्यंबक

स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. […]

1 2 3 4