समिक्षक

श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले. […]

जोशी, रामचंद्र भिकाजी (Sr)

संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म २१ जून १८५६ रोजी झाला. व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि “मराठी भाषेची घटना”, “मराठी शब्दसिद्धी” असे ग्रंथही लिहिले. “अलंकार विवेक”, “बालबोध […]

जोशी, रामचंद्र भिकाजी (Jr.)

प्रवासवर्णनकार, समीक्षक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म जुलै १९०३ मध्ये झाला. मजल दरमजल, वाटचाल आदी त्यांची स्थलवर्णनात्मक पुस्तके. काचेचे कवच, झम्मत हे त्यांचे कथासंग्रह तर “वाताहत” ही कादंबरी. “सोन्याचा उंबरठा” हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक तर “साठवणी” […]

गोविंदराव टेंबे

संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला. “माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते. गोविंदराव टेंबे यांचे मराठीसृष्टीवरील लेख. पहिल्या बोलपटाचे […]

महादेव नामदेव अदवंत

समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म ६ जून १९१४ रोजी झाला. लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते “माणुसकीचा धर्म”, “मनाची मुशाफिरी”, अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे “पैंजण”, “विनायकांची कविता”, “दहा कथाकार” अशी […]

निर्मलकुमार फडकुले

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. […]

रमेश तेंडुलकर

कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. […]

सारंग, विलास

११ जून १९४२ रोजी कारवार येथे जन्मलेल्या विलास सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. इंग्रजी विषयात एम्.ए, तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची १९६९ साली पीएच्. डी. आणि अमेरिकेतील इंडियाना […]

मंगरूळकर, अरविंद गंगाधर

मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. “सातवाहन राज्याच्या शेफालिका” चा गद्यानुवादाचे […]

1 2 3 4