मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

गांगल, दिनकर

ग्रंथाली प्रकाशन हे साहित्याची जाण व चोखंदळपणा या दोन्ही बाबींसाठी मराठी भाषेतील एक अग्रेसर प्रकाशन समजले जाते. दिनकर गांगल यांचा, या प्रकाशनाला गरूड भरारी मारण्यास प्रवृत्त करण्यामागील सहभाग महत्वाचा व मोलाचा मानला जातो. या रत्नपारखी […]

कोंडविलकर, माधव

प्रख्यात लेखक व आत्मचरित्रकार म्हणून माधव कोंडविलकर हे महाराष्ट्र तसंच साहित्य रसिकंना परिचयाचे आहेत. माधव कोंडविलकरांनी लिहिलेल्या “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे” नामक आत्मकथनाने तमाम वाचकवर्गावर आपली अनोखी छाप उमटविली होती. तरूण पिढीच्या असंख्य अव्यक्त महत्त्वाकांक्षांचे […]

आयरे, लाडकोजीराव कृष्णाजी

उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन […]

दाभोलकर, (डॉ.) नरेंद्र

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
[…]

काळे, वसंत पुरुषोत्तम (व.पु. काळे)

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.
[…]

पटवर्धन, राम

साक्षेपी संपादक आणि अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या राम पटवर्धन यांचा जन्म २१ मार्च १९२८ रोजी रत्नागिरीतील गणेशगुळे गावात झाला.महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी अनुवाद करायला सुरुवात केली.१९४९ मध्ये ते “मौज” साप्ताहिकात काम करू लागले तसंच मुंबईतल्या काही महाविद्यालयांत काही काळ अध्यापन देखील केलं .त्यांनी “नाइन फिफ्टी टू फ्रिडम” या पुस्तकाचा “अखेरचा रामराम” या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक “योगदीपिका” नावाने मराठी साहित्यात आणले.
[…]

मंडपे, (डॉ.) आशा रवींद्र

ठाण्यातील संगीत क्षेत्रातील आणखी एक मानाचं नावं व्हायोलिनवादक आणि संगीत विषयात पत्रकारीता करणार्‍या डॉ. आशा मंडपे होय. आशाताईंनी महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यांवर विशेष संशोधन केले.
[…]

माने, विजू गोपाळ

प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले. 
[…]

1 33 34 35 36 37 57