मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

फडके, दिगंबर त्र्यंबक (श्याम फडके)

श्याम फडके यांचे मुळ नाव दिगंबर त्र्यंबक फडके. त्यांचा जन्म ठाण्यामध्ये २६ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. बी. एस्सी. व एम. एड. चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉ. बेडेकर विद्यामंदिराचे काही वर्षे मुख्याध्यापक व ज्ञानसाधना विद्यालयाचे […]

पाळंदे, भास्कर

ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द […]

पाध्ये, कमल

पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांची पत्नी असलेल्या कमल पाध्ये यांनी “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांच्या पतीदेवांच्या […]

पाटील, कावेरीताई

१९४२ सालच्या ऊठावावेळी जेव्हा सबंध भारत स्वातंत्राच्या चैतन्यमयी लाटांवर स्वार होण्याकरिता संघटीत झाला होता, त्यावेळी स्त्रियांचं योगदान बहुमूल्य होतं; अश्या आवर्जुन घेतल्या जाणार्‍या नावांपैकी एक नाव म्हणजे कावेरीताई पाटील. मोर्चे व सत्याग्रहांमधील सहभागामुळे कावेरीताईंना दोन […]

परचुरे, अप्पा

अप्पा परचुरे हे “परचुरे प्रकाशन मंदिर या संस्थे”चे सध्याचे संचालक असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या साहित्यिक योगदानाचा यशस्वी वारसा पुढे चालवीत आहेत. अप्पांनी “माणुसकी” , “प्रकाशाची वाट” ही पुस्तके लिहिली असून “युगप्रवर्तक” या पुस्तकाचे संकलन देखील […]

पंडित, (डॉ.) वा. भ.

व्यवसायाने शल्यविशारद अशी ख्याती असणारे डॉ. वा. भ. पंडित हे संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासकही होते. “शब्दांगण” या प्रसिध्द मासिकाचे जनक म्हणून ते सर्वसामान्यांना परिचित आहेत. कविवर्य म. पां. भावे हे या नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत […]

देशपांडे, माधव काशिनाथ

१९१० रोजी जन्मलेल्या माधव काशिनाथ देशपांडे हे मराठी साहित्यिक व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते; त्यांनी “प्रा. फडके चरित्र आणि वाड्मय”, “खांडेकर चरित्र, आणि वाड्मय”, “माडखोलकर वाड्मय आणि व्यक्तिमत्व”, “पहिला पगार”, “धूम्रतरंग”, “साहित्य साधना”, “मंगला” अशी […]

देशपांडे, गणेश त्र्यंबक

मराठी त्याचप्रमाणे संस्कृत भाषांच्या प्राचीन व आर्वाचीन साहित्य प्रवाहांना एकत्रित करण्याबरोबरच, संस्कृत काव्यशास्त्राचा संपन्न इतिहास विस्ताराने गणेश देशपांडे यांनी मराठी रसिकांसमोर कलात्मकते सोबतच रेखीवपणे मांडला आहे. एक अत्यंत विद्वान मराठी साहित्यिक व संस्कृत ज्ञान झर्‍यांचा […]

थत्ते, राम

विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र […]

गांगल, भगवंत

भगवंत गांगल यांचे लेखन हे सहजस्फुर्तीमधून जन्माला आले. लेखनीक व्हायचे या आकांक्षेने ते कधीच जगले नसल्यामुळे, त्यांची लेखणी ही व्यावसायिक ध्येयाने कधीच मुहूर्तरूपात उमटली नाही. त्यात सफाईदारणा किंवा आभ्यासपूर्ण लिखाणामुळे जमून आलेली खमंग फोडणी नव्हती, […]

1 32 33 34 35 36 57