मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

नारायण हरी आपटे

ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे. त्यांचे लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे. […]

दत्तात्रेय अनंत आपटे

“अनंततनय” नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे. “श्री महाराष्ट्र शारदामंदिर” या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. “हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि “श्रीमत तिलक-विजय” हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर […]

रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट

मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट यांनी “पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र” अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाबाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली. “स्टोरीज ऑफ इंडियन […]

महादेव नामदेव अदवंत

समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म ६ जून १९१४ रोजी झाला. लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते “माणुसकीचा धर्म”, “मनाची मुशाफिरी”, अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे “पैंजण”, “विनायकांची कविता”, “दहा कथाकार” अशी […]

वामन रामराव कांत ( कविवर्य वा. रा. कांत )

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात,  त्या तरुतळी विसरले गीत,  सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत. वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर […]

प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कर्‍हाडे

साठच्या दशकात उदयास आलेल्या लेखक, विवेचनकार आणि अनुवादकारांच्या पिढीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कऱ्हाडे यांचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. मराठी साहित्याबरोबरच इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, संस्कृत, कन्नड, उर्दू, रशियन भाषांचे जाणकार म्हणून सदा […]

बळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
[…]

प्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे

राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्‍यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते […]

1 25 26 27 28 29 57