लेखक

जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली. […]

गणपती वासुदेव बेहेरे

बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. […]

केशव विष्णू बेलसरे

त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. […]

कृष्णदेव मुळगुंद

मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. […]

आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली. […]

अशोक शेवडे

अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते. […]

अशोक पाटोळे

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. […]

अरुण साधू

‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. […]

अरुण पुराणिक

एक अभ्यासक म्हणून अरुण पुराणिक यांना आजही मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे. […]

अनंत हरि गद्रे

अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्‍यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते. […]

1 2 3 4 5 6 23