पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

अनास्कर, विद्याधर

श्री विद्याधर अनास्कर व्यवसायाने कर सल्लागार आहेत. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत. […]

बोडके, नरेंद्र रघुवीर

मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
[…]

कुलकर्णी, अतुल खंडेराव

अतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो. […]

पालकर, शैलेश

श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात. […]

पुराणिक, रश्मी

रश्मी पुराणिक ह्या ई टी. व्ही. या आघाडीच्या वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या अतिशय चपळ व हुषार तरूण पत्रकार आहेत. पत्रकार म्ह्टला की त्याला समाजसेवकाचे अंग हे लागतेच. तळागाळातील महिला व पुरूष यांच्या खर्‍या, व वास्तवदर्शी जीवनांचे पारदर्शी चित्रण शहरी व सुसंस्कृत लोकांसमोर आणणे वाटते तेवढे सोपे काम नसते. त्यासाठी डोंगरदर्‍या पालथ्या घालुन दुरवरच्या गावांमध्ये निवासी व फलदायी मुक्काम करावा लागतो. तेथील लोकांच्या समस्या व दुःखे प्रत्यक्ष अनुभवावी लागतात, त्यांच्याशी कौशल्यपुर्ण पध्दतींनी संवाद साधावा लागतो.
[…]

वागळे, निखिल

निखील वागळे हे आय. बी. एन. लोकमत या मराठीमधल्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्तवाहिनीचे तेजस्वी व बाणेदार पत्रकार असून राजकारणी लोकांच्या ते फारसे पचनी पडलेले नसले तरी सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान त्यांनी केव्हाच पटकावलेले आहे. आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे ते वादांच्या भोवर्‍यांमध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते.
[…]

करंदीकर, पराग

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. […]

परब, मंदार

मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्‍या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्‍या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
[…]

दामले, योगेश

योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे.
[…]

शेटे, तुषार

तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वेगाने फोफावणार्‍या व आदर्श समाजबांधणीचे स्वप्न घेवून जगणार्‍या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच भयंकर आवड होती व ती आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे.
[…]

1 4 5 6 7 8