शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार्‍यांची माहिती

मनोहर जोशी

मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व.
[…]

भुजबळ, छगन

सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे धडपडणारे कणखर नेतृत्व. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून छगन भुजबळ यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे.
[…]

पाटणकर, राजाराम भालचंद्र (Ph.D)

विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. रा.भा.पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे. […]

बापट, गोविद शंकर

भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
[…]

वाडेकर, देविदास दत्तात्रेय

कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
[…]

भावे, पुष्पा

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.
[…]

गोखले, गोपाळकृष्ण

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला.
[…]

सावित्रीबाई फुले

उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.
[…]

1 9 10 11 12