जेव्हा मनाला मनाची ओळख पटते

जेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत. […]

तुम्ही कधी प्रेमात (धड)पडलांत का?

रसिकहो तुम्ही कधी अक्षरश: प्रेमात पडला आहात का? अक्षरश: हा शब्द कंसात बर का. सदर असेल तर गदिमांच्या या गीतात तुम्हाला ते प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा वेचता येतील, अनुभवता येतील. ज्या चित्रपटात गदिमांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती, त्या सौभाग्य चित्रपटातलं हे गीत. गदिमांच्या नायिका होत्या बेबी शकुंतला आणि सुलोचना. आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं. […]

गाणं की अर्थांची खाण?

गदिमांचे शब्द म्हणजे अर्थांच्या खाणी! 1953-54 च्या सुमारास गदिमांनी एकापाठोपाठ एक असे तीन चार रौप्यमहोत्सवी चित्रपट लिहिले. त्यातलाच हा चित्रपट, बाळा जो जो रे. हा चित्रपट प्रचंड चालला, त्यातलं बाळा जो जो रे हे गाणं अतिशय गाजले. या चित्रपटातलं हे भक्तीगीत ज्याच्यावर मराठवाड्यातील एक सत्पुरुष अडीच-तीन तास कीर्तन करत असत. तेच गीत आज आपल्यापुढे सादर होते. या चित्रपटात उषाकिरण, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस आणि धुमाळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीत वसंत पवार यांचं तर दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांचं. […]

फ़र्स्ट क्लास एक्स्ट्रा स्ट्रोंग लावणी ‘काठेवाडी घोड्यावरतं’ चैत्रबनातील पाऊलवाटा

रसिकहो ! गदिमांच्या चैत्रबनातील “हमरस्ते” आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आणि आवडीचे! पण माझ्या संगतीनं आपण धुंडाळायच्या आहेत आजवर फारशा न मळलेल्या पाऊलवाटा. कारण या वाटांवर मिळणार आहेत अनोख्या रंगांची आणि वेगवेगळ्या ढंगाची गीतफुले!! आपण त्या गीतातील ‘गदिमायीन’ शब्दकळेचा आणि अनवट स्वरसुगंधाचा मनमुराद आस्वाद घेऊया! […]

मी पुरवलेल्या कथा बिजावर वर गदिमांनी चक्क एक विनोदी गोष्ट लिहिली

आनंद माडगूळकरांनी सुचवलेल्या कथा बीजावर गदिमांनी एक विनोदी कथा लिहून ती आवाज या मासिकात कशी प्रसिद्ध झाली हे सांगणारा किस्सा. […]

आणि गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली

त्या हिंदी पाक्षिकाच्य संपादकापाशी या ‘राजकमलच्या’ मंडळींनी गदिमांची ‘कवीराज’ म्हणून एव्हढी भलामण केली कि तो संपादक बिचारा भारावून गेला आणि गदिमांनी कविता लिहिलीच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. शेवटी त्याच्या हट्टाकरिता शेवटी गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली. मात्र ही कवितासुद्धा तितकीच आशयघन होती. […]

1 2 3 4 10