जैसलमेर येथील मरु उद्यान

राजस्थानातील जैसलमेरमध्ये असलेले मरु उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात लक्षवधी वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत. इ.स. १९८० मध्ये या उद्यानाची निर्मिती झाली आहे.      

राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट

राजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली. १८०५ मध्ये ब्रिटिशशासक लॉर्ड लेकच्या नेतृत्वात सहा आठवडे किल्ल्याला घेरेबंदी होती.        

लालगड महल, बिकानेर, राजस्थान

राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.

जयपूरचे बिरला सभागृह

राजस्थानमधील जयपूर शहरात प्रसिध्द बी. एम. बिरला आंतरराष्ट्रीय सभागृह आहे. या सभागृहात १३५० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे सभागृह आहे.          

राजस्थानातील हिरवेकंच पर्यटन स्थळ – मेणाल

राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश हीच ओळख आपल्याला माहित आहे. राजस्थानला मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. मात्र या वाळवंटातही हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले असे एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. चितोड राजमार्गावर बुंदीपासून १०० किमी अंतरावर […]