सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला. समर्थ रामदास स्वामींची समाधीही याच जिल्हयात आहे. या जिल्ह्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली. शिक्षणाची गंगोत्री म्हणून हा जिल्हा सर्वत्र प्रसिध्द आहे. या जिल्हयातील कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वर व पाचगणी ही भारतातील सुप्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत.