जालना जिल्हा

आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असल्यामुळे या जिल्हयाला धार्मिक पावनस्पर्श लाभला आहे. याचबरोबर जालन्याजवळील उपग्रह अनुश्रवण भूकेंद्रामुळे (सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन ) आधुनिक भारतात या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच जिल्ह्यात स्थापन झालेल्या भारतीय बियाणे उद्योगाचे प्रणेते डॉ. बद्रिनारायण बारवले यांच्या ‘महिको’ (महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी) या कंपनीमुळे जालना जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले, ही या जिल्ह्याची खासियत.