इटली

इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.

इटलीचा इतिहास, विशेषतः लिखित इतिहास, अनेक सहस्रके जुना आहे. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हे युरोपमधील सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला देश समजला जात असे.

इटलीच्या उत्तरेस स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स व स्लोव्हेनिया हे देश आहेत. पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, पश्चिमेस तिर्‍हेनियन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे.

इटली देशाची २० विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यांपैकी पाच विभाग स्वायत्त आहेत व त्यांना आपल्या स्थानिक व्यवहाराशी निगडीत कायदे करण्याची मुभा आहे. हे २० विभाग एकूण १०९ प्रांतात विभागलेले आहेत व प्रांत ८,१०१ कोमुनी अथवा पंचायतींमध्ये विभागलेले आहेत.

प्रमुख शहरे
रोम
व्हेनिस
मिलान
बोलोन्या
तोरिनो

राजधानी व सर्वात मोठे शहर :रोम
अधिकृत भाषा :इटालियन
स्वातंत्र्य दिवस :मार्च १७, १८६१ (एकत्रीकरण)
राष्ट्रीय चलन :युरो (EUR)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*