इरिट्रिया

इरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियन व ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.

सध्या इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे.

१६ व्या शतकात ऑटोमन साम्राज्य येईपर्यंत इरिट्रियाचे स्वातंत्र्य अबाधित होते. १८९० मध्ये हा प्रदेश इटली देशाची वसाहत बनला. १८९६ व १९३६ मध्ये इथिओपियावर हल्ले करण्यासाठी इटलीने या प्रदेशाचा वापर केला. १९४१ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रदेश जिंकला. १९६२ पासून सुमारे ३० वर्षे एरिट्रीयन फुटीरवाद्यानी गनिमीकाव्याने युध्द सुरु ठेवले. १९९१ मध्ये इथिओपियन सरकार उलथवून टाकल्यानंतर हंगामी एरिट्रीयन सरकारची स्थापना केली. १९९३ मध्ये हा देश स्वतंत्र झाला.

राजधानी व सर्वात मोठे शहर : अस्मारा
अधिकृत भाषा : तिग्रिन्या, अरबी, इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : २४ मे १९९१
राष्ट्रीय चलन : नाक्फा

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*