अमेझॉन – जगातली सर्वात मोठी नदी

अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते. लांबीनुसार अमेझॉन जगातली दुसरी लांब नदी ठरते. हिची लांबी आहे ६,४०० कि.मी. म्हणजेच नाईलपेक्षा जेमतेम ३०० […]

व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश

जगात एकूण १७  देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे. या शहराचे क्षेत्रफळ ०.२ चौरस मैल आहे. या शहराची लोकसंख्या हजारापेक्षा कमी आहे. जगभरातील  रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजेच पोप यांचा मुक्काम येथे असतो.

नाईल – जगातील सर्वाधिक लांब नदी

जगातील सर्वाधिक लांब नदी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नाईल (Nile) नदीची नोंद घेतली जाते. पश्चिम आफ्रिकेतील बुरुंडी येथील व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणार्‍या नाईलचा प्रवास इथियोपिया, युगांडा, सुदान, इजिप्त या देशांना पार करतो.  या मोठ्या प्रवासानंतर ती भूमध्य समुद्रला येऊन मिळते. या नदीची लांबी ६६९५ किमी आहे.

जगातील सर्वात मोठा आशिया खंड

आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. १ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.

इथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण

इथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. अंटार्क्टिकाजवळील प्लेटो स्टेशन हे पृथ्वीवरील सर्वाधिक थंड ठिकाण गणले जाते. पाकिस्तानमधील जाकोकाबाद हे आशिया खंडातील सर्वाधीक तापमानाचे तर सैबेरियातील वव्यर्कियान्सक हे कमी तापमानाचे ठिकाण आहे.

1 30 31 32