सोलापूर – पर्यटनस्थळे

पंढरपूर – दक्षिणेची काशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या पंढरपूरमुळे सोलापूर जिल्हा धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर […]

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे […]

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

सज्जनगड/समर्थ रामदास स्थापीत मारूती- छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणा-या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. साता-याजवळ असलेल्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधीया असून येथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले […]

वाशिम जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

वाशिम – येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे […]

वर्धा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

बोर अभयारण्य – हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे. या अभयारण्यात असलेले वाघ, रानगवे, नीलगाई, चितळ, सांबर, मोर, […]

लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा […]

यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मुरली- येथे पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. पुसद – पूस नदीवरील पुसद हे ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. वाकाटक कालीन शिवमंदिराचे अवशेष येथे सापडले आहेत. कळंब – विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर […]

मुंबई जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मुंबादेवी – याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे. श्री बाबुलनाथ मंदिर – मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ […]

नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

रामटेक – नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात […]

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

माहूरची रेणूकादेवी (शक्तीपिठ) – दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, […]

1 13 14 15 16 17 18