सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात. हैदर अलीवर स्वारीसाठी निघण्याआधी माधवराव पेशवे यांनी हे तळे नीट डागडूजी करून त्यात थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली. पुढे […]

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर

बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे. १५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले. छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.

हसन मशीद – मोरोक्को

मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे. या मशिदीचा मिनार २१० मीटर उंच आहे. या मिनाराला ६० मजले असून, सुमारे १ लाख लोक येथे नमाज पडू शकतात.

सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केल्याचा उल्लेख त्रृग्वेदात आहे. १७ वेळा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. इ.स. १०२४ मध्ये मोहम्मद गजनी याने पाच हजार सैन्यासह हल्ला करुन […]

अरुणाचल प्रदेशातील पवित्र परशुराम कुंड

अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात. एकाच दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी केल्याची नोंद आहे.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी […]

बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्‍या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत […]

ऐतिहासिक शहर नाशिक

गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. नाशिक हे महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे नागरी शहर आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण व्यवसायाला चालना […]

नागपूरची दीक्षाभूमी – बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. तेव्हापासून नागपूर हे जगातील सामाजिक परिचर्तनाच्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरले. येथील स्तूप शिल्पकलेचा […]

पुणे येथील कसबा गणपती

कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे. इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. […]

1 2 3 4 5 6 8