बुलढाणा जिल्हा

Buldhana District

वायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्‍या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान (सिंदखेड राजा) हे या जिल्ह्याचे ठळक वैशिष्ट्य होय. तसेच भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे संत गजानन महाराज हेदेखील बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे.