बदरपूर

आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला जाण्यासठी प्रथम सीलचरला जावे लागते. तेथून पुढे बसने जावे लागते.

बदरपूरला भेट देण्यासाठी मार्च किंवा ऑक्टोबर हे महिने उत्तम आहेत. करीमगंज लोकसभा मतदारसंघात हे शहर समाविष्ट आहे. या शहरात जरी मुख्यत्वे आसामी भाषा बोलली जात असली तरी येथील बहूसंख्य लोकांना हिंदी भाषाही चांगल्या प्रकारे अवगत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*