अमरावती जिल्ह्याचा इतिहास

अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो. अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. हेच गाव आता कौंडिण्यपूर म्हणून ओळखले जाते. गावाजवळील अंबादेवीच्या मंदिरात रुक्मिणी पूजेसाठी आली असताना तिचे श्रीकृष्णाने अपहरण केले अशी कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाच्या ”अमर’ या नावावरून अमरावती हे नाव रूढ झाल्याचेही मानले जाते.
अमरावती जिल्ह्याने मौर्य, गोंड, मोगल, मराठे व ब्रिटीश अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत. १८५३ पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असणारा हा जिल्हा नंतर इंग्रजांच्या हाती आला. १९५६ साली झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर अमरावती मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई प्रांताकडे आला. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, तेव्हा अमरावतीला स्वतंत्र जिल्ह्याचे अस्तित्व प्राप्त झाले.

Video ‘a historic event’ or ‘an historic academic writing for graduate students answer key chapter 2 event’

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*