यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो. जिल्ह्यातील राजूर, वणी, आष्टोना, चिंचोली, ढाणकी येथे दगडी कोळशाच्याही खाणी आहेत. तसेच पठारी भागात बांधकामाचा काळा दगड सापडतो. जिल्ह्यात हातविणकाम(हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*