चव्हाण, दत्ता

Chavhan, Datta

मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय. राष्ट्रीय क्रीडा प्रशाळेची प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दत्ता चव्हाण यांनी शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून सहभाग घेतला. १९८४ ते १९९२ या काळात ते ठाणे जिल्हा अॅथलेटिक संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९९२ ते २०११ कार्याध्यक्ष म्हणून आणि २०११ पासूनच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत.

नागरी व ग्रामीण खेळाडूंना प्रशिक्षण देणारे चव्हाण १९८८ ते १९९६ मध्ये खजिनदार म्हणून कार्यरत होते. या सर्व पदांवर असूनही त्यांनी आपले सामाजिक भान सतत जागरुक ठेवले आणि त्याचाच एक भाग म्हणून गरजू खेळाडूंना ते विनामूल्य मार्गदर्शन करतात. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या खेळाडूंपैकी २५ राष्ट्रीय स्तरावरील पदक तर ५०० राज्य स्तरावरील पदकविजेते खेळाडू आहेत. त्यापैकी १० जणांच्या नावे राष्ट्रीय विक्रम आहे. तसेच ठाणे शहरात होणार्‍या “ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धे” च्या स्थापनेपासून सचिव म्हणून कार्यरत आहेत.

(संदर्भ : माझे ठाणे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*