साहित्य: १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं
कृती: लहान कुकरमध्ये तेलावर जिरं घाला. तडतडलं की लसूण पाकळ्या ठेचून घाला. त्या चांगल्या लाल होऊ द्या. त्यावर हिंग-हळद-तिखट घाला. लगेचच पाणी ओता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. एका वाटीत तिन्ही पिठं घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून चांगलं कालवा. हे कालवलेलं पीठ उकळत्या पाण्यात घाला. त्यात मीठ घाला. झाकण लावून ५ मिनिटं मंद आचेवर ठेवा.
आजारी माणूस नसेल तर तिखटाचं प्रमाण वाढवा.
Leave a Reply