तेलावरची पुरणपोळी

साहित्य : २ वाटी हरभरयाची डाळ, पावकिलो ला जरा कमी असा गुळ (ढेकळे फोडुन) ( चवीनुसार गोड कमी-जास्त करु शकता) , वेलची पावडर (ऑप्शनल), चिमुट भर मीठ.

कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात डाळ शिजु शकेल इतके पाणी गरम करत ठेवल. पाण्याला उकळी आली की डाळ पाण्यात टाकली. मीठ टाका. परत एकदा सरसरुन उकळी आणुन गॅस बारीक करुन ठेवला. भांड्यावर तिरके झाकण टाकुन ठेवले. १०-१५ मि, नंतर पळीने डाळ चाचपुन बघितली. हातात फुटली की समजावे की डाळ शिजली आहे. गॅस बंद करावा. पाणी पूर्ण काढुन घ्यावे नाहीतर पुरण पातळ होते. आता डाळीच भांडं परत गॅसवर ठेवुन गुळ अॅनड करा. गुळाचे पाणी सुटेल त्यात डाळ पूर्णपणे शिजुन जाईल. जरा मिश्रण हाटलुन घ्या. गॅस मोठा करुन गुळाचा रस आटु द्या..
तेलाच्या पोळीला जेवढे बारीक पुरण तेवढी पोळी मऊ होते.

पोळीचे साहित्य
१ १/२ वा टी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी मैदा, मीठ, पाणी.
कृती. मैदा, गव्हाचे पीठ चाळुन घेऊन मीठ टाका. थोडे थोडे पाणी टाकत कणीक मळुन घ्या. पण ही कणीक रेगुलर चपातीच्या कणीकीपेक्षा मऊ पाहिजे. गरज पडली तर तेलाचा हात घेऊन कणीक चरचरुन मळुन घ्या. नंतर पाणतुटी करुन घ्या. तयार कणीकेला तेलाचा १ चमचा घेऊन तेल मुरेपर्यंत मळा.

पुरणपोळी कृती:-
हाताला तेल लावुन छोटासा कणीकेचा गोळा करुन घ्या. तो हातावरच पसरत पसरत म्हणजे कडेने पुरी येवढ्या आकारत करुन घ्या. पुरणाचा छोटासा गोळा करुन लांबट आकाराचा , तो हळु हळु कणीकीच्या गोळ्यात भरायचा. हात फिरवत फिरवत मोदकासारखे साईडची कणीक वरतुन आणुन गोळा बंद करा. दोन्ही हाताने हलकेसे दाबत गोळा चपटा करुन तेल लावलेल्या पोळपाटावर मध्यभागी तेलाची धार सोडुन गोळा हाताने थपथपा. ह्यामुळे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरते. तोंड बंद केलेली गोळ्याची बाजु खाली गेली पाहिजे. तेल लावलेले लाटणे एका दिशेने फिरवत पोळी लाटा. पोळी लाटताना पोळपाट फिरवा. आणी काठात लाटा.

गोलाकार पोळी झाल्यावर लाटणे पोळीच्या समोरील कडेवर ठेवा. काटाने अलगद उचलुन पोळी लाटण्यावर रोल करा. हे लाटणे हळुवार फिरवत आतल्या साईडने पुर्ण पोळी लाटण्यावर घ्या. दुसरा काठ अधांतरीच ठेवा नाही तर पोळी तव्यावर सुटी करताना चिकटेल.

तवा चांगला तापला आहे याची खात्री करा पोळी असलेले लाटणं अलगद तव्यावर पोळी सोडली जाईल ह्या बेताने बाहेरच्या बाजुला फिरवत आणा. पोळी टम टमीत पुरी सारखी फुगली की साईडला होल करुन हवा जाऊ द्यावी नाहीतर वाफ हातावर येते. एक साईड भाजली की पोळी परतुन टाका. तेलाचा हलका-सा हात लावा. परत परता आणी चांगली दोन्ही बाजूनी भाजुन घ्या. खाली सुती कापड अंथरुन त्या वर पोळ्या निम्या एकावर एक रहतील अश्या टाका. म्हणजे गरम पण राहतात पण चिकटत नाहीत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*