साहित्य:- दोन वाट्या मऊ गूळ, अर्धी वाटी दाण्याचे व तिळाचे कूट, दोन चमचे बेसन, थोडे साजूक तूप, वेलची-जायफळ पूड एक चमचा, कणीक व तांदळाची पिठी.
कृती:- तुपावर बेसन भाजावे. गुलाबी रंग आल्यावर गॅस बंद करावा. नंतर त्यात गूळ घालावा. बेसन गरम असल्याने गूळ विरघळेल. नंतर त्यात शेंगदाण्याचे व तिळाचे कूट घालावे. जायफळ-वेलची पूड घालावी. मिश्रण गार करावे. नंतर कणीक भिजवून घ्यावी. कणकेची गोल वाटी करून त्यात सारण भरावे. कणकेची वाटी बंद करून पिठीवर पोळी लाटावी. नॉनस्टिक पॅनवर भाजावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
??