साहित्य :- दोडकी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्यांचा कीस करावा, दोन मोठे चमचे देशी तीळ, अर्धी वाटी किसलेले गोटा खोबरे, पाव वाटी दाण्याचे जाडसर कूट, आवडीप्रमाणे तिखट आणि मीठ, चिमूटभर सायट्रिक ऍसिड, एक लहान चमचा पिठीसाखर, तीन मोठे चमचे तेल.
कृती :- प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply