पपईचे काही पदार्थ

पपई जॅम
साहित्य:- तयार पपईचा १ किलो गर + साखर ७५० ग्रॅम + सायट्रीक अॅसिड १० ग्रॅम.
कृती:- सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा व त्यामध्ये साखर व सायट्रीक अॅसिड घालून मंद अग्नीवर १०३ डी. सें. तापमानापर्यंत गरम करावे. त्यातील प्रवाही पाण्याचा अंश संपला की जाम तयार झाला असे ओळखावे. नंतर अग्नीवरून खाली उतरवून थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यामध्ये जाम भरून बरणीवर थोडे मेण (पॅराफिन वॅक्स) ओतावे. अशा रितीने उत्तम प्रतीचा टिकावू जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पपईचे सरबत
साहित्य:- अर्धपक्व पपई, चिमुटभर जिरे, आवश्यकतेनुसार साखर, दोन कप दूध, थोडे मीठ व थोडे केशर.
कृती:- प्रथम पपई चुलीवर किंवा गरम राखेत करपणार नाही अशी भाजून घ्यवी. नंतर तिची साल काढून गराचे तुकडे करावेत. हे तुकडे चाळणीवर चिरडून गाळून घ्यावेत. त्यामध्ये पाणी, साखर, भाजलेल्या जिर्याेची पूड, मीठ व केशर टाकून ढवळून घ्यावे. तयार झालेला सरबत थंड झाल्यावर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पपई मार्मालेड
जामप्रमाणे मार्मालेड बनविले जाते. फरक एवढाच की, मार्मालेड बनविताना त्यामध्ये संत्र्याच्या सालीचे पातळ तुकडे (२- ३ सेमी लांबीचे) टाकतात. हे तुकडे प्रथम एका भांड्यात २ – ३ वेळा पाणी बदलून उकळून घ्यावेत. म्हणजे त्यामुळे संत्र्याच्या सालीचा कडवटपणा कमी होतो व साली मऊ बनतात. नंतर पपई मंदाग्नीवर ठेवून त्यामध्ये समप्रमाणात संत्र्याच्या सालीचे तुकडे टाकावे. अशा पद्धतीने मार्मांलेड तयार होते हे बनविण्यामागचा हेतू एवढाच की, जॅम गोड असल्याने सर्वांनाच आवडतो असे नाही. त्यामुळे यामध्ये संत्र्याच्या सालीमुळे याला थोडासा कडवटणा येत असल्याने परदेशात मागणी आहे. शिवाय संत्र्याच्या सालीतील अन्नद्रव्य या पदार्थामध्ये येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पपई टुटीफ्रुटी
साहित्य:- कच्च्या पपईच्या गराचे चौकोनी तुकडे १ किलो + साखर १ किलो + पाणी १ लिटर (पाकासाठी) + पाणी अर्धा लिटर (चुन्यासाठी) + चुना ४ टी सपूर + सायट्रिक अॅसिड १ टी स्पून + रंग आवडीप्रमाणे.
कृती:- प्रथम चुना, पाणी एकत्र करून त्यामध्ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावेत. नंतर दुसर्या २ – ३ वेळा धुवून पांढर्याु मलमलच्या कापडात बांधून ३ ते ५ मिनीटे वाफवून घ्यावे. नंतर हे तुकडे थोडा वेळ थंड पाण्यात ठेवावेत. साखरेचा एक तारी पाक करून गाळून घ्यावा व त्यामध्ये हे तुकडे पुर्ण एक दिवस ठेवावेत. नंतर तुकडे वेगळे करून पाक दोन तारी होईपर्यंत उकळावा. उकळताना त्यात सायट्रिक अॅसिड मिसळावे. नंतर पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्यावर त्यात तुकडे मिसळून २ – ३ दिवस ठेवावेत. तुकड्यांमध्ये पाक चांगला शिरल्यावर ते तुकडे पाकातून काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरून ठेवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पपई केक
साहित्य:-केक बनविण्यासाठी पिकलेल्या पपईचे घट्ट तुकडे ५०० ग्रॅम, साखर ३ कप, तूप १ कप, अंडी ३, मैदा ३ कप, खाण्याचा सोडा १ चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ पाव चमचा, व्हॅनिला (इसेन्स) १ चमचा, दालचिनी, लवंना, जायफळ प्रत्येकी पाव चमचा.
कृती:- प्रथम साखर व तूप एकत्र घोटून त्यात अंड्याचा बलक व पपईचे तुकडे चांगले मिसळावेत, नंतर तुपाने किंवा डालड्याने आतून गुळगुळीत केलेल्या भांड्यात १० मिनीटे १६० डी. सें. तापमानपर्यंत भाजून नंतर १३५ डी. सें. तापमानापर्यंत खाली आणून ३५ मिनीटांपर्यंत भाजून घ्यावे. भाजल्यानंतर केकच्या भांड्यात काढून केक थंड होऊ द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कच्च्या पपईचे थालीपीठ
साहित्य :- कच्ची पपई लहान आकाराची १, लसुन पाकळ्या २-३, हळद १ चमचा, हिंग १/२ चमचा, ओवा १ चमचा, जीरे १ चमचा, हिरवी मिरची किंवा लाल तिखट ऐच्छिक आहे. मीठ चवीनुसार बाजरीचे पीठ १ वाटी, बेसन पीठ १/२ वाटी, गव्हाचे पीठ १/४ वाटी.
कृती :- प्रथम कच्ची पपई किसुन घेणे. लसूण बारीक करून घ्या.त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले मळून घ्या. अगदी थोडसच पाणी वापरा मळताना. नंतर तव्यावर थालीपीठ थापून घ्या. वरतून थोडस तेल सोडा .खमंग भाजून घ्या. हिरवी चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*