पनीर रसमलाई

साहित्य: १ लीटर दूध, ४ वाट्या साखर, १ कंडेन्सड मिल्कचा डबा, २ ते ३ कप सायीसकट दूध, ४-५ वेलदोड्याची पूड, थोडी केशराची पूड,१ टेबलस्पून मैदा.

पाककृती:

१ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.

दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.

परातीत हे नासलेले दूध व मैदा ऐकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.

एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात वरील सोडा.

गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.

कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*