साहित्य:- भाजके पोहे पाचशे ग्रॅम, शेंगदाणे दोन वाटी, पंढरपुरी डाळे एक वाटी, कांद्याचे वाळवलेले काप एक वाटी, सात-आठ लसूण पाकळ्या, तीन ते चार तळलेली आमसुले, पिठीसाखर, लाल तिखट, मीठ चवीनुसार, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, एक वाटी तेल. धने, जिरे, शहाजिरे, बडीशेप, मिरे, लवंग, तीळ प्रत्येकी अर्धा टेबल स्पून, तमालपत्र तीन ते चार.
कृती:- धने, शहाजिरे, लवंग, तमालपत्र, बडीशेप, तीळ, मिरे थोड्या तेलात परतून भाजून घ्यावे. नंतर मिक्स्रवर त्याची बारीक पूड करावी. तेल तापवून त्यात वाळलेले कांद्याचे काप तळून कुरकुरीत काढावेत. त्या तेलात दाणे, डाळे, कढीपत्ता तळावा. नंतर त्याच तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. लसूण घालावा. गॅस बंद करावा, खाली उतरवा. नंतर लाल तिखट, मीठ, वाटलेली मसाला पूड व आमसूल पूड व भाजके पोहे घालावेत. मंद गॅसवर परतावे. नंतर शेवटी डाळ, शेंगदाणे, कांदा घाला. गोड होईल इतकी पिठीसाखर (चवीनुसार) घालावी. परत चिवडा मिक्सग करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply