नारळी भात

साहित्य: ३/४ कप तांदूळ, दिड कप पाणी, २ + १ टेस्पून साजूक तूप, २ ते ३ लवंगा, १/४ टिस्पून वेलची पूड, १ कप गूळ, किसलेला (टीप २), १ कप ताजा खोवलेला नारळ, ८ ते १० काजू, ८ ते १० बेदाणे.

कृती: तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे. तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे. गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे. जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे. भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*