मलई कोफ्ता

साहित्य :- पनीर पाव किलो, उकडलेले बटाटे दोन, काजू-बेदाणे अर्धी वाटी, गरम मसाला पूड अर्धा चमचा, मिरची पूड, थोडं कोर्नफ्लॉवर, तळणासाठी तेल, चवीनुसार मीठ .

ग्रेव्हीसाठी :- तेल पाव वाटी, शहाजिरं अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, कांदे दोन मोठे , काजू पाव वाटी,     लाल तिखट एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, टोमाटो प्युरी पाव वाटी, सायीचं दही अर्धी वाटी, चवीनुसार मीठ-साखर, थोडं क्रीम व कोथिंबीर .

कृती :-

१)      बटाटे किसून मऊ मळावेत .  त्यात इतर पदार्थ घालून सर्व एकजीव करावं .

२)      त्याचे मोठया गुलाबजामप्रमाणे गोळे करून त्यात थोडे काजू-बेदाणे भरावे .

३)      पुन्हा गोल आकार देऊन कोफ्ते मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत .

४)      कांदा व काजूची पेस्ट करावी .  ग्रेव्हीसाठी तेलात शहाजिरं फोडणीला घालावं .

५)      त्यावर आलं-लसूण पेस्ट , कांदा-काजूची पेस्ट , लाल तिखट , गरम मसाला इ. परतून मग दही , टोमाटो प्युरी , मीठ व साखर घालावी .

६)      गरजेनुसार गरम पाणी घालून दाटसर ग्रेव्ही करावी .  शेवटी त्यात कोफ्ते सोडून क्रीम व कोथिंबीर घालून दयावं .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*