कारवारी मसाला
साहित्य: १०० ग्रॅम लाल मिरची, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मेथी, एक वाटी मिरी, चार-पाच चमचे हळद पावडर, २०० ग्रॅम धणे, अर्धा वाटी मोहरी, एक वाटी तीळ, अर्धा वाटी चण्याची डाळ.
कृती : एका भांडय़ात हे सर्व पदार्थ टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्यावी. हा मसाला ड्राय भाजीत किंवा कुठच्याही डाळीत खूप चांगला लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सुकरुंडे
साहित्य: १ वाटी मूग, १ वाटी ओलं खोबरं, दीड वाटी गूळ, वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी मैदा, तळण्यासाठी तेल.
कृती: मूग थोडे भाजून मऊ शिजवून घ्यावेत. शिजलेले मूग पाणी काढून कोरडे करुन घ्यावेत. मूगामध्ये ओलं खोबरं, गूळ घालून हे पुरणासारखे वाटून घ्यावे व त्यात वेलदोड्याची पूड घालावी. मैदा भज्याच्या पिठाप्रमाणे पाण्यात भिजवून घ्यावे. मूगाच्या मिश्रणाचे लहान गोळे या पिठामध्ये भिजवून घ्यावेत व भज्याप्रमाणे तेलामध्ये तळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाच्या रव्याचे थालिपीठ
साहित्य: १ वाटी तांदळाचा रवा, अर्धी वाटी खवलेले खोबरे, १ कांदा बारीक चिरुन, दोन हिरव्या मिरच्या व थोडं आलं यांची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ व साखर चवीनुसार, तेल
कृती: तांदळाच्या रव्यात वरील सर्व पदार्थ घालून ते पाणी घालून मळून घ्यावे. तव्याला तेल लावून त्यावर या मिश्रणाचे थालिपीठ थापून घ्यावे. मंद आचेवर थालिपीठ खरपूस भाजून घ्यावे व सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दूधीभोपळा खीर
साहित्य: अर्धा किलो दूधी साल काढून बरीक किसलेला, चणाडाळ अर्धा तास पाण्यात भिजवून २ चमचे, १ वाटी खवलेले खोबरे, १ वाटी गूळ, वेलदोड्याची पूड, काजूचे तुकडे
कृती: दूध आणि चणाडाळ मऊसर शिजवून घ्या व घोटून घ्या. यात गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत शिजवा, नंतर त्यामध्ये नारळाचा चव किंवा दूध घाला. वेलदोड्याची पूड व काजूचे तुकडे घालून ही गरमागरम खीर सर्व्ह करा
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वाटाणा उसळीचे मसाला पोहे
साहित्य: १ वाटी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवलेले, १ कांदा, २ हिरव्या मिरच्या, पातळ वाट्या २ वाट्या, अर्धी वाटी खवलेलं खोबरं, २ चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला, बारीक शेव, मीठ व साखर चवीनुसार.
कृती: वाटाणे, बारीक चिरलेला कांदा आणि मिरच्या घालून मऊ शिजवून घ्या. पातळ पोहे, तिखट, गरम मसाला, साखर व मीठ घालून हाताने कुस्करुन एकत्र करा. खोलगड डीशमध्ये पहिल्यांदा पोहो त्यावर वाटाण्याची उसळ घाला. त्यावर शेव भुरभुरून हे मसाला पोहे सर्व्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हिरव्या वाटाण्याचा कारवारी रस्सा
साहित्य – हिरवे वाटाणे – १ वाटी, उभा चिरलेला भाजलेला कांदा – १ वाटी, भाजलेला खोबरे खीस – १/२ वाटी,ठेचलेल्या लसून पाकळ्या – ५-६ नग, धने पूड – २ चमचे, कोकम – २ साले, ठेचलेले आले – १/२ चमचा,भाजलेले जिरे – १ चमचा, लाल मिरची पूड – चवीनुसार, मीठ – चवीनुसार, फोडणीचे साहित्य – गरजेनुसार.
कृती – वाटाणे ७-८ तास भिजवून ठेवावेत. कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. कांदा, खोबरे, लसून, धने पूड, कोकम, आले, जिरे एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. कढई मध्ये २ चमचे तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात मिरची पूड, मीठ कालवावे. शिजलेले वाटाणे घालून १ वाटी पाणी घालून एक उकळी आणावी. गरमागरम भातासोबत झणझणीत रस्सा मजा आणेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply