गुलगुले

साहित्य:- २ वाट्या पुरण, जायफळ – वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे, २ वाट्या उडदाच्या डाळीचे पीठ, थोडी पिठीसाखर, तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा तूप.
कृती:- पुरणात जायफळ, वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे घालावेत. उडदाच्या डाळीच्या पिठात थोडे मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर व पाणी घालून सरसरीत कालवावे. (भजीच्या पिठाप्रमाणे) तेल तापले की पळीभर तेल त्यात घालावे. पुरणाचे छोटे – छोटे गोळे ह्या पिठात बुडवून तळावेत. गरमागरम गुलगुले वाढावेत व साजूक तुपाबरोबर खावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*