हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात. आपली निरोगी जीवनशैली बिनदिक्कतपणे चालू राहण्यासाठी आपल्या शरीराला लोहाची जास्त गरज असते. रोजच्या जेवणामुळे ते आपल्याला मिळू शकत नाहीत. या भाज्यांमध्ये सर्वात जास्त फॉलिक अॅसीडचे प्रमाण असल्यामुळे गरोदर बायकांना अतिशय उपयुक्त असतात. हे खनिज पदार्थ माणसाच्या शरीरात खूप महत्वाच्या भूमिका पार पाडत असतात. जास्त पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला मेद कमी, तंतुमय पदार्थ जास्त मिळत असल्यामुळे आपल्याला वाढलेल्या रक्तदाबाचे प्रमाण कमी ठेवण्यास मदत करते, ह्रुदय रोग ,कर्करोग, मधुमेह पासून वाचवतात. यामुळे जास्त वाढलेले वजन सुद्धा कमी होऊ शकते. वारंवार खाण्याचा मोह कमी होतो. आपण जास्त हिरव्या पालेभाज्या का खायला हव्यात याचे खाली थोडी कारणे दिलेली आहेत.

शरीरातील पाण्याची पातळी नियमित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात सगळे आपल्याला सांगतात की पाणी भरपूर प्या नाहीतर कमी पाणी प्यायल्या मुळे डीहायड्रेशनचा धोका संभवू शकतो. पण हिरव्या पालेभाज्या पण खा असे म्हणणारा क्वचितच असतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ते खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी नियमित राखण्यास मदत होते.

मॅग्नेशियमचा स्त्रोत संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की अधिक गडद रंगाच्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मानवी शरीरामध्ये मॅग्नेशियमचे महत्त्व खूप आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक व्याधींना आमंत्रण मिळते जसे अस्थमा, बेचैन होणे, हृदयरोग, स्नायु आखडणे. म्हणून नेहमी वरचेवर आपण मॅग्नेशियमची कमतरतेने ग्रस्त आहोत का हे सारखे तपासत राहावे.

दृष्टीची ताकद वाढवते जीवनसत्त्व अ पुरेपूर असल्यामुळे डोळ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. अगदी लहान वयापासूनच मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला घातल्या तर चष्मा लवकर लागत नाही.

हाडांच्या मजबूतीसाठी हिरव्या पालेभाज्यांत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ”क” असल्याने आपली हाडांना, दातांना बळकटी मिळते. या जीवनसत्त्वमुळे ऑस्टोकॅल्सिनची उत्पत्ती होते ज्यामुळे हाडांना बळकटी प्राप्त होते. विशेषत: महिलांमध्ये हाडे वयाच्या ३० वर्षानंतर ठीसूळ होण्याचे प्रमाण वाढते आहे त्यांचा हिरव्या पालेभाज्या खाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. म्हणुन हाडे बळकट करण्यासाठी अगदी लहान वयापासूनच पालेभाज्यांचा आहारात जास्त समावेश व्हायला हवा.

वजन योग्य राखण्यास मदत वजन कमी करणे ही काही जादू नाही त्यामुळे एखाद्याने आपले वजन कमी करण्याचे ठरवले की त्याच्या खाण्याच्या तक्त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असायला हवा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेदाचे प्रमाण कमी असते आणि तंतुमय पदार्थ प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन अजिबात नाही वाढत. डब्बाबंद आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्यापेक्षा हिरव्या पालेभाज्या जास्त खाण्यात ठेवा. पुढील दृष्टीने हिरव्या पालेभाज्या खाणे केव्हाही हितावह आहे.

चांगले अंन्टिऑक्सीडअंट हिरव्या पालेभाज्या चवीला जरी चांगल्या लागत नसतील तरी आहारात त्यांचा समावेश हवाच. तुमच्या त्वचेच्या काही तक्रारी असतील तर त्या जीवनसत्त्व ई आणि क मुळे कमी होण्यास मदत होते. त्वचा प्रसाधनांवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा पालेभाज्या आणून खाणे अतिशय कमी किमतीत होते. यामुळे आपली त्वचा मुळापासून चांगली आणि निरोगी होते खूप नितळ दिसते.

तरुण दिसण्यासाठी मोठ्या मोठ्या त्वचेच्या शस्त्रक्रिया करून आपले वय लपवण्यापेक्षा हिरव्या पालेभाज्या खाऊन आपण तेच काम करू शकतो. हिरवा रंग उस्ताहाचे प्रतिक आहे आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानंतर ते एखाद्याच्या चेहेऱ्यावर लगेच दिसुन येते.

गरोदर बायकांसाठी अतिशय चांगले एक चांगली आई होऊन आपल्या उदरात वाढत असलेल्या जीवाला चांगले निरोगी जीवन देण्यासाठी प्रयंत्नशील असते. आई होण्यापूर्वी या उदासवाण्या हिरव्या पालेभाज्या खाणे म्हणजे कंटाळवाणे काम तुम्हांला वाटेल. बाळंतपणात होणारा उच्च रक्तदाब, मधुमेह याने टाळता येऊ शकतो.

भरपूर लोहयुक्त तुम्ही सध्या केस गळती पासुन त्रस्त असाल तर पालेभाज्या खायला सुरवात करा. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे असे घडते. मुख्यत्वे करून पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणत लोह असते ज्याने हिमोग्लोबिनची रक्तातील पातळी वाढते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*