कॉर्न उसळ

साहित्य: चार कणसे, चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, दोन चिरलेले कांदे, अर्धी वाटी ओले खोबरे, साखर, एक चमचा मीठ, हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तेल, चिरलेली कोथिंबीर.

कृती: कणसे कुकरमध्ये शिजवून नंतर किसणीवर किसून घ्यावीत. किसताना दाणे व दांड्यांचा कीस बाजूला ठेवावा. खोबरे व दाणे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. तेलावर हिंग, मोहरीची फोडणी करावी. त्यात हळद, मिरच्या, कढीपत्ता व कांदा घालावा. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात मक्याचा कीस घालावा. मीठ व साखर चवीनुसार घालून वरून कोथिंबीर घालावी.

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*