भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १ – प्रास्ताविक

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं.

सुजलाम् सुफलाम् असलेल्या, एकेकाळी सर्व दृष्टींनी समृद्ध असलेल्या आपल्या देशावर, धन लुटण्यासाठी, राज्य करण्यासाठी अनेक आक्रमणे झाली. या आक्रमणांमुळे आपल्याकडच्या गोष्टी, पद्धती जशा त्या लोकांनी त्यांच्या देशात नेल्या त्याचप्रमाणे त्यांच्या काही गोष्टींचा, पद्धतीचा परिणाम आपल्या पद्धतीवरही झाला. आज ज्या गोष्टी आपल्या आहाराचा एक अपरिहार्य भाग आहेत त्या पूर्वी आपल्या आहारात समाविष्ट नव्हत्या. विविध आक्रमणांच्या, त्या संस्कृतीचा परिणाम आपल्या अन्न पद्धतीवर झाल्यामुळे झालेला हा बदल आहे. इतिहासकारांनी लिहून ठेवलेली माहिती, देशातील विद्वानांनी लिहून ठेवलेली ग्रंथ आणि उत्खननातून मिळालेली माहिती यांच्या आधारे या बदलांचा मागोवा आपण आता घेणार आहोत.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*