आजचा विषय कुकीज

सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खरं म्हणजे बिस्किटं आणि कुकीज यात काही फारसा फरक नाही. दोन्ही बेक करूनच तयार केले जातात. मात्र बिस्किटांमध्ये गोड आणि नमकीन असे प्रकार पाहायला मिळतात तर कुकीजमध्येही स्वाद भरपूर असले तरीही त्यांची चव ही गोडच असते. घरच्या घरी कुकीज करायच्या म्हटल्यावर कित्येकांना दडपण येईल. मात्र या कुकीज करायला अतिशय सोप्या आहेत आणि अर्थात घरी केल्यामुळे त्यांचा स्वादही चांगला असतो. नानकटाई सोडली तर घरच्या घरी बिस्किटं किंवा कुकीज करण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अगदीच थोडी लोकं करतात. कारण अन्य काही प्रकार कदाचित त्यांना माहितीच नसतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही कृती कुकीजच्या
बिस्किट चुरा कुकीज
साहित्य- एक दिड वाटी तुकडे झालेल्या बिस्किटांचा चुरा,प्रत्तेकी दोन चमचे कणिक,दोन चमचे ब्रेड क्रंब्स,दोन चमचे बारीक रवा,पाच सात सीड्लेस खजूर ,एक चमचा खसखस,एक दिड चमचा गुळ,दिड चमचा खोबरा कीस बारीक,एक दिड चमचा साजुक तूप,एक दिड चमचा कुठलाही च्यवनप्राश..
कृती – प्रथम कणिक किंचित तुपावर गरम करुन घ्यावी. मग रवाही गरम करुन कणकेमधे मिक्स करुन ठेवावा.त्यातक गुळाला एक उकळी करुन त्यात टाकावा,खसखस कच्यीच बारीक करुन घालावी मग खोबरा कीस, गरम करुन साजूक तूप बिस्किटाचा चुरा आणि खजूर पेस्ट करुन व च्यवनप्राश आहे तसेच मिश्रणात टाकुन गरम केलेले साजूक तुपे घालावे मोहन म्हणून मग सगळेच मिश्रण मिक्सीवर एकजीव करुन घ्यावे, ओव्हनला १२० डिग्री वर गरम करुन त्यातील ग्रीलवर हव्या त्या आकारात बिस्किटे खसखस वर थापून पाच ते सात मिनिटे ओव्हन ला लावावीत पुन्हा उलटे करुन दोन तीनच मिनिटे ठेवावीत. मधूमेही लोकांसाठी ही कुकीज अतिशय पौष्टीक असतात बंद डब्यात आठ ते दहा दिवस छान टिकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चॉकलेट चिप्स कुकीज
एका बाऊलमध्ये कणिक, मीठ, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुस-या एका बाऊलमध्ये साखर आणि बटर एकत्रित करून घ्यावा. पूर्ण एकजीव होईपर्यंत ते हँडमिक्सरने एकत्रित करावं. म्हणजे ते हलकं होईल. आता या हलक्या झालेल्या मिश्रणात अंडी आणि व्हॅनिला एकत्रित करून तेदेखील एकजीव करून घ्या. हे एकजीव झालेलं मिश्रण कणकेत घालावं. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. पांढरा भाग दिसणार नाही असा तो एकजीव करावा. नंतर त्यात चॉकलेटच्या चिप्स घालाव्यात. ओव्हन १८० अंश सेल्सिअसला प्रथम तापवून घ्यावा. आता हे मिश्रण बेकिंग प्लेटमध्ये चमच्याच्या साहाय्याने घालून घ्या. खाली चिकटू नयेत म्हणून त्याला तुपाचा हात लावा किंवा बाजारात पेपर मिळतो त्याचा वापर करा, पंधरा मिनिटं ओव्हनमध्ये बेक करा. सोनेरी रंग होईपर्यंत बेक करा. नंतर बाहेर काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

शुगर कुकीज
ओव्हन ३५० डिग्रीला तापवून घ्यावा. कणिक, मीठ, बेकिंग सोडा एकत्रित करून घ्यावं. चांगलं मिक्स करावं. त्यानंतर दुस-या बाऊलमध्ये बटर, शुगर, व्हॅनिला आणि अंडी एकत्रित करा. मिश्रण चांगलं हलकं होईपर्यंत फेटा. हलकं झालेलं मिश्रण पिठात ओता. चांगलं एकजीव करा. पीठ दिसता कामा नये. चमच्याच्या साहाय्याने ते मिश्रण बेकिंग ताटात ठेवा. ग्लासच्या साहाय्याने त्याला वरून थोडासा दाब द्या. त्या ताटाला तूप लावून घ्यायला विसरू नका. थोडीशी साखर वरून भुरभुरवा. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत पंधरा मिनिटं बेक करा. झाली शुगर कुकीज तयार. थंड करून खा. या कुकीजवर तुम्ही चॉकलेटने किंवा आइसिंगने डेकोरेट करू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

नो बेकिंग बटर कुकीज
एका भांडय़ात दूध आणि साखर घालून ते मध्यम आचेवर उकळायला ठेवा. साखर विरघळेपर्यंत उकळवा. आता त्यात बटर, व्हॅनिला इसेन्स, भुईमुगाच्या शेंगा आणि मीठ घालून एकत्रित करा. थोडेसे ओट्सदेखील घाला. हे मिश्रण जरा पातळ असतं. चांगलं एकजीव झालं की ते बटरपेपरवर किंवा थाळीत चमच्याच्या साहाय्याने घाला. यासाठी तुम्हाला ओव्हन तापवण्याची गरज नाही. पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर या कडकडीत होतील. त्या उचलताना पूर्ण उचलल्या गेल्या पाहिजेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आल्याच्या कुकीज
कणिक चाळून त्यात, बेकिंग सोडा, मीठ, दालचिनी, आल्याची पूड किंवा पेस्ट, लवंग पूड, व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. साखर आणि बटर एकजीव करून हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. फेटलेल्या मिश्रणात अंडी, व्हॅनिला इसेन्स घाला. हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत गॅसवर गरम करा. चांगलं ढवळा. चॉकलेटी रंगाचं हे मिश्रण आता कणकेत घाला आणि चांगलं एकजीव करा. कणकेचा गोळा तयार होईल. हा गोळा फ्रीजमध्ये अध्र्या तासासाठी ठेवा. नंतर तो काढून घ्या आणि बटर पेपरवर पाव इंच जाडीमध्ये थापून घ्या. कटरच्या साहाय्याने गोल आकारात कापून घ्या. ३५० डीग्री तापवलेल्या ओव्हनमध्ये चॉकलेटी रंग होईपर्यंत बेक करा. थंड करून सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

व्हीट अल्मन्ड कुकीज
साहित्यः- १ कप गव्हाचे पीठ, १ स्टिक अनसॉल्टेड बटर (रूम टेंपरेचरला आलेले), पाऊण कप पिठीसाखर, १ चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, १/४ कप बदाम
कृती:- बदामाचे फ्लेक्स (लहान तुकडे) करून घ्या. त्यातले थोडे बिस्किटं सजवायला बाजूला काढून ठेवा. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बटर, पिठीसाखर, मीठ, वेलचीपूड, बदामाचे फ्लेक्स हाताने चुरून घाला. मिश्रण चांगलं मळून त्याचा एक गोळा करून घ्या. मळताना गरज वाटली तर १-२ चमचे बटर/तूप अजून घाला. ओव्हन 360 °F ला प्रिहिट करायला लावा. एका कुकी शीटला अल्युमिनियम फॉइल लावून घ्या. मळलेल्या मिश्रणाच्या गोळ्याचे आता लहान लहान (पेढ्याएवढे) गोळे करून घ्या. त्यावर बदामाचे फ्लेक्स लावून बिस्किटं थोडी चपटी बनवून कूकीशीटवर एकमेकापासून बर्यालपैकी अंतरावर ठेवा. (कारण बेक केल्यानंतर कुकीजचा साइझ जवळजवळ दुप्पट होतो.) ओव्हन प्रिहिट झाल्यानंतर ५ मिनिटांनी ही कुकीशीट ओव्हनमध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बदाम कुकीज
साहित्य : १२५ ग्रॅम बटर, १२५ ग्रॅम साखर, २५ मिलि. पाणी, १५० ग्रॅम मैदा, २ ग्रॅम बेकिंग पावडर, १ टीस्पू व्हॅनिला इसेन्स.
कृती : साखर आणि बटर एकत्र करून चांगलं फेटून घ्या. त्यात पाणी आणि क्रीम घाला. मग व्हॅनिला इसेन्स घाला. मैदा चाळून घेऊन त्यात बेकिंग पावडर घाला. त्यात बटरचं तयार केलेलं मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. मिश्रण घट्ट होण्यासाठी वीस मिनिटांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. आवडीप्रमाणे बदामाचं काप किंवा पिस्त्याचे तुकडे किंवा कॉर्नफ्लेक्स तयार ठेवा. ते कुकीजच्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्या. मग बोराच्या आकाराचे गोळे करून बेकींग ट्रे मध्ये सेट करा. १४० अंश वर तापवलेल्या ओव्हनमध्ये दहा मिनिटं बेक करा. गार झाल्यावर कुकीज खुसखुशीत होतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चॉकलेटमध्ये बुडवलेली काजू पिस्ता कुकी
साहित्य:- ३ वाटी मैदा, २ वाटी लोणी, १.२५ वाटी साखर, १ अंड्याचे पिवळे, २ चमचा व्हॅनिला ईसेन्स, १/२ वाटी काजू, १/२ वाटी पिस्ता, १ वाटी सेमी स्वीट चॉकोचिप्स, १/४ वाटी पांढर्या चॉकोचिप्स, ५ चमचा शॉर्टनिन्ग.
कृती:- एका भांड्यात लोणी आणि साखर घालुन फेटणे. त्यात अंड्याचे पिवळे आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन पुन्हा फेटणे. काजू मिक्सर मध्ये वाटून बारीक पूड करणे. वर बनवलेल्या मिश्रणात ही पूड घालणे. मैदा चाळून वरच्या मिश्रणात घालणे. घट्ट एकजीव होईपर्यंत मिश्रण चांगले ढवळणे लिंबाच्या आकाराचे लाडू बनवून फ्रीजमध्ये १ तास थंडे होण्यासाठी ठेवणे. ३७५F/१९०C वर ओव्हन गरम करणे. पिस्त्यांचे बारीक तुकडे करणे. प्रत्येक लाडू तळव्यावर घेऊन हलका दाबून जाड चकत्या बनवणे. बारीक चिरलेले पिस्त्यांचे तुकडे अर्ध्या कुकीवर पसरवणे. हलके दाबून पिस्ते कुकीमध्ये ढकलणे. पार्चमेंट पेपर बेकिंग तव्यावर घालुन कुकी ठेवणे. प्रत्येक कुकीत साधारण १ इंच जागा सोडणे.
३७५F/१९०C वर ओव्हनमध्ये १२ मिनिट भाजणे. अंदाजे ५-१० मिनिट कुकी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. एका भांड्यात सेमीस्वीट चॉकोचिप्स आणि ४ चमचे शॉर्टनिन्ग घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. मध्ये ३० सेकंद झाल्यावर एकदा ढवळणे. मिश्रण चकचकीत आणि एकजीव होईपर्यंत चांगले ढवळणे. बेकिंग तव्यावर पार्चमेंट पेपर पसरवणे. प्रत्येक कुकीचा पिस्ते नसलेला भाग चॉकोलेटमध्ये बुडवून बेकिंग तव्यावर ठेवणे. एका भांडयामध्ये पांढर्या चोकोचिप्स आणि उरलेले १ चमचा शॉर्टनिन्ग घालुन ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे. मिश्रण चांगले एकजीव आणि चकचकीत होईपर्यंत ढवळणे. एका पायपिंग बॅगमध्ये हे चोकोलेट घालुन आधीच्या चोकोलेटवर झिग झॅग रेषा काढणे. चोकोलेट साधारण एक तास सेट होण्यासाठी ठेवणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*