मांद्रेकर, श्रद्धा

व्हि.पी.एम. महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या श्रद्धाचं शालेय शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस शाळेतून झालं. श्री प्रताप चव्हाण आणि त्यानंतर श्री. नाईक यांच्याकडून अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या श्रद्धा मांद्रेकरांनी महाराष्ट्र रज्याच्या संघाचं १९८१ ते १९८६ अशी सलग पाच वर्षं कर्णधार पद भूषविलं.
[…]

मुजुमदार, दीपक

दीपक मुजुमदार एक यशस्वी भरतनाट्यम नर्तक, गुरु आणि नृत्य दिग्दर्शक या तीनही वैशिष्ट्यांचे मानकरी ठरले आहेत. नृत्यातील आपल्या अभिनय कौशल्याने दीपकजींनी भारतीय शास्त्रीय नृत्याची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
[…]

गोडबोले, वरदा संदेश

ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. संगीतभूषण राम मराठे यांसारखे ज्येष्ठ गायक याच ठाण्यातले. त्यांच्या पासून सुरु झालेली ही परंपरा आज अभिमान वाटावी इतकी उच्च दर्जाची झाली आहे. […]

टिपाले, प्राजक्ता कैलास

वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.
[…]

खारकर, रमेश गणेश

ठाण्याचं निसर्गसौंदर्य, तलावांचा सुंदर परिसर यामुळे ठाण्याचं वातावरण खरोखरचं अल्हाददायक वाटतं. मग अशा वातावरणात खेळाडू निर्माण न होतील तरच नवल. अशा खेळाडूंना स्फूरण देणारं आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारातलं ज्येष्ठ नाव म्हणजे रमेश गणेश खारकर हे होय
[…]

सांगवेकर, सौरभ रामदास

जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे.
[…]

अन्याल, कैलास विनायक

चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली. […]

राणे, सायली दीपक

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवणारी सायली राणे ही ठाण्यातील सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीतील बॅडमिंटनपटू आहे.
[…]

वाड, श्रीकांत

मुंबई विद्यापीठातून बी.फार्म, एल.एल.बी. पदव्या मिळवलेले श्रीकांत वाड यांनी अतिशय विरोधाभासी क्षेत्रात आपलं नाव मिळवून ठाण्याला मोठं केलं आहे. एका बाजूला बी.फार्म आणि एल.एल.बी. तर दुसरीकडे बॅडमिंटन या दोन टोकांच्या क्षेत्रात श्रीकांत वाड यांनी आपली छाप सोडली आहे.
[…]

1 2 3 4 5 6 8