परांजपे, राजा

शाळेत असतानाच नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मूकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवले जाई, त्या वेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले. […]