पंडीत, वेधस

वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला. […]

पंडित श्रीकांत देशपांडे

किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.
[…]