डॉ. भगवान गणेश कुंटे

ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्‍या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला. “औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ […]

नारायण बापूजी कानिटकर

नारायण बापूजी कानिटकर हे लेखक, नाटककार आणि अनुवादक होते. “तरुणी शिक्षण नाटिका” आणि “संतती कायद्याचे नाटक” लिहून सद्य सामाजिक विषयांवरील मराठी नाटकांचा पाया त्यांनी रचला. ४५ वर्षाच्या आयुष्यात, वकिली शिक्षणानंतर त्यांनी १० नाटके लिहिली होती. त्यांत बडोदे संस्थानातील विषप्रयोग (मल्हारराव महाराज), […]

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे

निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. “वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. १५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Anna Moreshwar Kunte

माधव राजाराम कानिटकर

“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्‍या आणि शंभरावर कथा लिहिल्या. चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची […]

अंबादास शंकर अग्निहोत्री

कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले. मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह. १६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.     Ambadas Shankar Agnihotri

त्रिंबक नारायण आत्रे

“गावगाडा” या पुस्तकाचे लेखक, ग्रामीण समाजरचना व मागास जातिसंस्थेचे अभ्यासक त्रिंबक नारायण अत्रे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८७२  रोजी झाला. “गावगाडा”त पारंपारिक बलुतेदारांसह विविध जाती-जमातींचा परिचय त्यांनी करुन दिला असून समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक […]

प्रभाकर गोविंद अत्रे

सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्‍यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे.   Prabhakar Govind Atre

काशिनाथ वासुदेव अभ्यंकर

महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला. “पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.   Kashinath Vasudeo Abhyankar

बळीराम जनार्दन आचार्य

बळीराम जनार्दन आचार्य  हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे.   Baliram Janardan Acharya    

1 2 3 4 7