मृणाल देव-कुलकर्णी

मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. […]

मुग्धा चिटणीस

मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. […]

मुक्ता बर्वे

२०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत. […]

मुकुंद जयकर

वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. […]

मीना प्रभू

अनेक वर्षांपासून लंडन, न्यूयॉर्क, रोम, इराण, चीन, तिबेट अशा अनेक देशांना भेटी देऊन त्या अनुभवाला शब्दबद्ध करणाऱ्या मीना प्रभू यांनी या प्रवासवर्णने साहित्य प्रकाराला आजही ताजेतवाने ठेवले आहे. […]

मिलिंद तुळाणकर

जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात. […]

मिलिंद गुणाजी

महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. […]

मास्टर भगवान

डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. […]

मास्टर दत्ताराम

मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. […]

मास्टर अविनाश

शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. […]

1 5 6 7 8 9 80