मृणाल देव-कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल झळकली होती.

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘रमा माधव’ या मराठी सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चे दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांच्यासोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*