संजय भागवत

उत्तम वाचन व साहित्याची चांगली जाण असलेले संजय मितभाषी, विनम्र स्वभाव व उत्तम निर्णयक्षमता या स्वभाववैशिष्ट्यांसाठी ओळखले जात.  […]

रमेश भाटकर

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर हे मराठी चित्रपट, रंगमंच आणि टिव्ही अभिनेते होते. रमेश भाटकर यांनी आपल्या ‘डॅशिंग’ आणि सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवली.  […]

रमाकांत आचरेकर

भारतरत्न सचिन तेंडुलकर सहित अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे आणि पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य प्रशिक्षक श्री रमाकांत आचरेकर हे खर्‍या अर्थाने क्रिकेटचे  महागुरू होते.  […]

जोशी, सुहास

सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. […]

छत्रपती संभाजी महाराज

जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले. […]

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. […]

प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे

कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. ‘पेरणी, मळणी, राखण, खोळंबा’ मिळून १५ कथासंग्रह. तसेच ‘पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती’ या कादंबर्‍या. ‘पिकलं पान, विहीर’ ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर […]

शुभा खोटे

चित्रपटांची संपूर्ण दुनिया ग्लॅमरभोवती फिरते त्यामुळे अनेकदा पुरस्कारांवर प्रमुख नट-नटय़ांचीच नावे कोरली जातात आणि चरित्र अभिनेते त्यापासून वंचित राहतात. पी. सावळाराम पुरस्कारांमध्ये शुभा खोटेंचे नाव येणे हे त्यामुळे चकित आणि आनंदित करणारे आहे. पावणेदोनशे चित्रपटांमध्ये […]

बाबा पदमनजी

(मे 1831- 29 ऑगष्ट 1906) मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाड्गमयाचे जनक. पुर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. जन्म बेळगावचा. शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असतांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले; बायबल; तसेच […]

देवधर, वि. ना.

एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले […]

1 5 6 7 8 9 79