रमाकांत आचरेकर

ऋषितुल्य प्रशिक्षक, क्रिकेटचे  महागुरू 

भारतरत्न सचिन तेंडुलकर सहित अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे आणि पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य प्रशिक्षक श्री रमाकांत आचरेकर हे खर्‍या अर्थाने क्रिकेटचे  महागुरू होते.

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ साली मालवण येथे झाला. त्यांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, पण प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.

२०१० मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी १९९० साली त्यांना मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. दादरला शिवाजी पार्क येथे त्यांनी कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले.

सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले. सरांचा हा क्लब आणि त्यांचे कार्य आता त्यांची मुलगी कल्पना मुरकर हिने सुरु ठेवले आहे.

पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवान्वित झालेल्या आचरेकरसरांचे क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडविण्यात आचरेकरसरांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घडविलेल्या अनेक खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षक म्हणूनही कारकीर्द घडविली आहे. पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या नैसर्गिक गुणांना पैलू पाडण्याचे त्यांचे तंत्र विशेष होते,

आचरेकर सरांचे ३ ते ४ शिष्य एकाच वेळी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळत होते. आजवर कोणत्याही गुरूचे एकापेक्षा जास्त शिष्य आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाचवेळी खेळले नाहीत.

रमाकांत आचरेकर यांचे दि. २ जानेवारी २०१९ रोजी मुंबईत दादर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

## Ramakant Acharekar

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*