रमेश भाटकर

मराठी चित्रपट, रंगमंच आणि टिव्ही अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर हे मराठी चित्रपट, रंगमंच आणि टिव्ही अभिनेते होते. रमेश भाटकर यांनी आपल्या ‘डॅशिंग’ आणि सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवली.

रमेश भाटकर हे प्रसिद्ध भजनसम्राट-संगीतकार स्नेहल (वासुदेव) भाटकर यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ रोजी झाला.

त्यांचे अनेक मराठी चित्रपट गाजले आहेत. मुख्यत: पोलिस इन्स्पेक्टरच्या त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या त्यांच्या मालिका बर्‍याच गाजल्या. त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. माहेरची साडी, अष्टविनायक, दुनिया करी सलाम हे त्यांचे गाजलेले चित्रपट.

अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी २८ वर्षे भूमिका साकारली.

रमेश भाटकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने तीन दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आपला दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’ या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका गाजल्या. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.

त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. ‘अश्रूंची झाली फुले’ हे त्यांचे नाटक विशेष गाजले. ‘केव्हातरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. वयाची सत्तरी गाठली तरी भाटकर यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. वार्धक्याच्या खुणाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसल्या नाहीत. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते. काही महिन्यांपूर्वीच ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता.

४ फेब्रुवारी २०१९ रोजी रमेश भाटकर यांचे मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यापूर्वी सुमारे वर्षभर तेरमेश भाटकर कर्करोगाशी झुंज देत होते.

रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी न्या. मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे.

 


Ramesh Bhatkar was a Marathi film, stage and TV actor. Of the various roles that Ramesh has portrayed, he was best known for his roles in the TV series Commander and Hello Inspector.

He has worked for more than 30 years as an actor in the mainstream commercial movie industry of Marathi as well as of Hindi. Ramesh Bhatkar was born to the illustrious music director-composer and accomplished singer Mr. Snehal (Vasudeo) Bhatkar in 1949. In addition to his artistic background, in his early college days he was a champion swimmer, played for the college aquatics team, and was an enthusiastic kho-kho player with the reputed Vijay Club in Dadar.

Ramesh Bhatkar was married to Mridula Bhatkar, now a judge in Bombay High Court.

Main stream Movie debut was with film Chandoba Chandoba Bhaglaas ka (1977) followed by AshtaVinayak (1978), Duniya kari Salam, Maaherchi Manasa, Aapli Maanasa, and Maherchi Sadi (1991). (Of his nearly 90 films, most are in Marathi, with a few in the Hindi language.)

His prosperous television career showcased very popular detective serials such as Hello Inspector (1990) on DoorDarshan, Commander (1992) on Zee TV, Teesra Dola (1998) on DD2; all these made Ramesh a very popular TV personality. He also appeared in Haddapaar, Bandini, Yugandhara; his career includes about 30 series with more than 1,000 episodes aired.

Marathi Theatre had been his first love with very prominent lead roles in numerous plays. He played a lead role in Ashroonchi Zaali Phule (1975) which ran on Marathi theatre industry for about 28 years. For the last 30 years, Ramesh had played lead roles in such plays as Ooghadale Swargache Daar (1982), Denaryaache Haath Hazaar (1980), Shadyantra (1991), Kevha Tari Pahate, Akher Tu Yeshilach, Rahu Ketu, Mukta, The Boss- Sutradhar, Kinara. (About 50 different plays)

Ramesh Bhatkar passed away on 4th February 2019 at Mumbai after fighting for a long time with cancer.

## Ramesh Bhatkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*