पाटील, दिनकर

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.

[…]

डोंगरे, दया

मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
[…]